** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, October 1, 2021

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन

 


कोल्हापूर, दि. 1 (जिमाका) : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कळंबा येथे सोमवार दि. 4 ऑक्टोबर रोजी शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांनी दिली आहे.

       या मेळाव्याकरिता जिल्ह्यातील नामांकित आस्थापना हजर राहणार आहेत. जे प्रशिक्षणार्थी आयटीआय उत्तीर्ण आहेत व ज्यांना ॲप्रेंटिशिप अद्याप मिळालेली नाही त्या प्रशिक्षाथ्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर येथे सर्व मूळ कागदपत्रासह सकाळी 10.30 वा. उपस्थित रहावे.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.