** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, October 8, 2021

मागासवर्गीय शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची फी वसुल करु नये सहायक आयुक्त समाज कल्याण विशाल लोंढे

 


कोल्हापूर, दि. 8 (जिमाका) : शिष्यवृत्तीधारक पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून सन 2011-12 ते 2017-18 या कालावधीतील फी प्राप्त नसल्याने काही शिक्षण संस्था संबंधित वर्षाची फी आकारल्याशिवाय विद्यार्थ्यांचे कागदपत्र देण्यास मनाई करत आहेत. मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून फी घेऊ नये या शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील महाविद्यालयांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या प्रलंबित फी रक्कमेसाठी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व इतर कागदपत्रांची आडवणूक केल्यास संबंधित महाविद्यालयावर शासन नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे आहवान समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनु.जाती, विजाभज, इमाव विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाकडून शिष्यवृत्ती शिक्षण फी परीक्षा इतर योजनांचा लाभ दिला जातो. जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित विनाअनुदानित महाविद्यालयांचे अभ्यासक्रम सुरु असणाऱ्या महाविद्यालयांनी आपल्या महाविद्यालयामध्ये प्रवेशिक शिष्यवृत्तीधारक पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारु नये. मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारल्याचे निदर्शनास आल्यास शासन निर्णयानुसार फौजदारी कारवाई करण्यात येईल.

00000

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.