** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, June 2, 2020

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी माविमच्या महिला सक्रीय गरीब, गरजूंना मोफत जेवण व जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा - वरिष्ठ जिल्हा समन्वयक बाळासाहेब झिंजाडे राजोपाध्येनगरमध्ये कोव्हिड-19 बाबत जनजागृती कार्यक्रम








कोल्हापूर, दि. 2 (जिल्हा माहिती कार्यालय) :- कोरोनाच्या प्रतिबंधासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाकडील बचत गटाच्या महिला सक्रीय झाल्या असून  समाजातील गरीब,गरजू,भिकारी तसेच लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या विद्यार्थी व लोकांना मोफत जेवण देण्याबरोबरच गरजूंना भाजीपाला, दुध, अन्नधान्य, सॅनिटायझर आणि मास्क उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती माविमचे वरिष्ठ जिल्हा समन्वयक बाळासाहेब झिंजाडे यांनी दिली.
महिला आर्थिक विकास महामंडळाचे कोल्हापूर जिल्ह्या १०८ गावात १ महानगरपालिका व ९ नगरपरिषदच्या माध्यमातून जवळपास ३७२५ बचत गट कार्यरत असून जवळपास ५५८७५ महिलांचे संघटन करण्यात आले आहे. या बचत गटात गरीब, गरजू, विधवा, परीतक्ता, घटस्फोटीत, मागासवर्गीय, दिव्यांग, भूमिहीन, अल्पभूधारक व SECC यादीमधील महिलांचा समावेश आहे. या महिलांनी कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जनजागृतीचे विविध उपक्रम हाती घेतले असून लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या गरीब, गरजूंना जेवणासह अन्य आवश्यक बाबी उपलब्ध करुन देण्यात पुढाकार घेतला आहे. तसेच बचत गटातील महिला सामाजिक अंतराचा नियम पाळून गावा-गावात जनतेशी संपर्क साधून कोव्हिड -१९ बाबत जनजागृती देखील करीत आहेत.
        येथील राजोपाध्येनगरमध्ये  माविमच्या आरंभ वस्तीस्तर संघाच्यावतीने कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांवर आधारित जनजागृती कार्यक्रम सोशल डिस्टसिंगचा अवलंब करून करण्यात आला. या कार्यक्रमात कोव्हिड -१९ विषयी माहिती देण्यात आली. लोकांनी कोरोना विरुध्दच्या लढाईत जिंकण्यासाठी मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतर या प्रमुख बाबींसह शासनाच्या सूचनेनुसार अन्य उपाययोजना प्राधान्याने करण्याचे आवाहन महिलांनी केले.  कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी स्वच्छता मोहीम महत्वाची असून वस्तीमध्ये विलगीकरण झालेल्यांची सोय करणे तसेच नियंत्रण ठेवणेही गरजेचे आहे.  एखादी व्यक्ती बाधित जिल्ह्यातून आली असेल तर त्वरित कोल्हापूर महानगरपालिकेस संपर्क करावा. आपल्या भागातील वयोवृद्ध, गरोदर माता, लहान मुले व आजारी व्यक्ती यांची योग्य ती काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी कोरोना आजारावर मात करून घरी आलेल्या व्यक्तिचे  सर्वांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. स्वागतासाठी सर्वांनी भागात रांगोळी काढलेली होती. ती व्यक्ती  गाडीतून उतरताच त्याच्यावर पुष्पवृष्टी करून टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. तसेच आरंभ वस्तीस्तर संघ व इतर वस्तीस्तर संघातील महिलांनी त्यांचे औक्षण केले. शेवटी उपस्थित नागरिकांना मास्क, सॅनिटायझर व अन्नधान्याचे कीट वाटप केले.  या कार्यक्रमास माविम व स्फूर्ती लोकसंचलीत साधन केंद्राचे कर्मचारी, आरंभ वस्तीस्तर संघातील सदस्य, महिला स्वयं-सहाय्यता बचत गटातील महिला, सीपीआर रूग्णालयामधील नर्स, आशा वर्कर, पोलीस कर्मचारी, सफाई कर्मचारी व भागातील नागरिक उपस्थित होते.    
000000









No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.