कोल्हापूर,दि. 4 (जिल्हा माहिती कार्यालय): आजअखेर 653 रूग्णांपैकी
391 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज रात्री 9 वाजता 278 प्राप्त
अहवालापैकी 265 अहवाल निगेटिव्ह तर यातील 8 अहवाल पॉझीटिव्ह आहेत, यातील 2
पॉझीटिव्ह अहवाल पुन्हा आढळून आलेत, 1 अहवाल नाकारण्यात आला, 2 अहवाल प्रलं,
आजअखेर जिल्ह्यात एकूण 256 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक
डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
आज रात्री 9 वाजेपर्यत प्राप्त 8
पॉझीटिव्ह अहवालामध्ये, आजरा 2, चंदगड-3, कागल- 1, करवीर- 1, पन्हाळा- 1 असा
समावेश आहे.
आजअखेर तालुका, नपा आणि मनपा
क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 59, भुदरगड- 67, चंदगड- 75,
गडहिंग्लज- 67, गगनबावडा- 6, हातकणंगले- 6, कागल- 55, करवीर- 14, पन्हाळा- 25,
राधानगरी- 63, शाहूवाडी- 169, शिरोळ- 7, नगरपरिषद क्षेत्र- 11, कोल्हापूर
महापालिका क्षेत्र-21 असे एकूण 645 आणि पुणे -1, मुंबई-1, सोलापूर-3, कर्नाटक-2
आणि आंध्रप्रदेश-1 इतर जिल्हा व राज्यातील 8 असे मिळून एकूण 653 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात
संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण 653 रूग्णांपैकी
391 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 6 जणांचा मृत्यू झाला. आजअखेर
जिल्ह्यातील उपचारार्थ दाखल रुग्णांची संख्या 256 इतकी आहे.
0 0 0 0 0 0
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.