कोल्हापूर,दि.
11 (जिल्हा माहिती कार्यालय): नोकरी इच्छुक उमेदवारांनी नवीन नाव नोंदणी
रजिस्ट्रेशन करताना महास्वयंम पोर्टलवर आपला आधार नंबर व मोबाईल नंबर लिंक करून नोंदणी करावी असे आवाहन
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता व मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त
ज.बा.करीम यांनी केले आहे.
नोकरी इच्छुक उमेदवारांनी महास्वयंम पोर्टलवर नोंदणी (Employment card)
केलेली आहे. पण, उमेदवारांनी आधारकार्ड नंबर व मोबाईल नंबर लिंक केलेला नाही त्यांनी
www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी अद्ययावत करणे आवश्यक
आहे. काही अडचण असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता व मार्गदर्शन
केंद्र, भवानी मंडप, कोल्हापूर कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 0231-2545677 वर
संपर्क साधावा.
|
नविन
नाव नोंदणीसाठी पाथ
www.mahaswayam.gov.in
- > Home Page -> Employment -> Job Seeker -> Login
आधारकार्ड
लिंक करण्यासाठी पाथ
www.mahaswayam.gov.in
- > Home Page -> Employment -> Job Seeker -> UserID ->
Password -> Login -> AdharNumber
->Captcha
|
0 0 0 0 0 0
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.