इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

रविवार, २६ जुलै, २०२०

आजअखेर 1431 जणांना डिस्चार्ज -डॉ. बी. सी. केम्पी पाटील

आजअखेर 1431 जणांना डिस्चार्ज

                                                          -डॉ. बी. सी. केम्पी पाटील

       कोल्हापूर,दि. 26 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज सकाळी 10 वाजेपर्यंत 778 प्राप्त अहवालापैकी 576 निगेटिव्ह तर 162 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (पाठपुराव्याने 1 अहवाल पॉझीटिव्ह, 30 अहवाल प्रलंबित तर 9 अहवाल नाकारण्यात आले.) अँन्टेजेन टेस्टिंग चाचणीचे 77 प्राप्त अहवालापैकी 59 निगेटिव्ह आहेत, तर 18 पॉझीटिव्ह असे एकूण 180 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 4144 पॉझीटिव्हपैकी 1431 जणांना डिस्चार्ज देण्यात आले आहेत. आजअखेर जिल्ह्यात एकूण 180 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.

          आज सकाळी 10 वाजेपर्यंत प्राप्त 180 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-3, चंदगड-6, हातकणंगले-4, करवीर-26, पन्हाळा-1, शिरोळ-1, नगरपालिका क्षेत्र- 32, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 106 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 107, भुदरगड- 99, चंदगड- 342, गडहिंग्लज- 203, गगनबावडा- 9, हातकणंगले- 269, कागल- 79, करवीर- 480, पन्हाळा- 180, राधानगरी- 146, शाहूवाडी- 246, शिरोळ- 110, नगरपरिषद क्षेत्र- 917, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-897 असे एकूण 4084 आणि इतर जिल्हा व राज्यातील 60 असे मिळून एकूण 4144 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 4144 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 1431 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 117 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 2596 इतकी आहे.

0000000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.