** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Sunday, July 19, 2020

जिल्ह्यातील 1 मार्ग बंद



कोल्हापूर, दि. 19 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील 1 राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली.
करवीर तालुक्यातील कोल्हापूर शहराचा बाह्यवळण रस्ता कळंबे साळोखेनगर बालिंगे शिंगणापूर रामा-194 मार्गावरील शिंगणापूर केटीवेअर रस्त्यावर 1.5 फूट पाणी आल्याने वाहतुक बंद असून आंबेवाडी चिखली मार्गे पर्यायी वाहतुक सुरू आहे. 
00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.