कोल्हापूर,दि. 20 (जिल्हा माहिती कार्यालय) :
आज सकाळी 10 वाजेपर्यंत 344 प्राप्त अहवालापैकी 322 निगेटिव्ह तर 23 अहवाल
पॉझीटिव्ह आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 2287 पॉझीटिव्हपैकी 1015 जणांना डिस्चार्ज
देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 1213 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
आज सकाळी 10 वाजेपर्यंत प्राप्त 23 पॉझीटिव्ह
अहवालापैकी हातकणंगले- 1, करवीर-1, राधानगरी-7, शिरोळ-2, नगरपालिका क्षेत्र- 4,
कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 7 व इतर राज्य व जिल्हा-1 असा समावेश आहे.
आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची
संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 100, भुदरगड- 85, चंदगड- 274, गडहिंग्लज- 157,
गगनबावडा- 7, हातकणंगले- 89, कागल- 67, करवीर- 251, पन्हाळा- 90, राधानगरी- 91,
शाहूवाडी- 221, शिरोळ- 68, नगरपरिषद क्षेत्र- 459, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-285
असे एकूण 2244 आणि जिल्हा व राज्यातील 43 असे मिळून एकूण 2287 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात
संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण 2287 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 1015
रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 59 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर
उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 1213 इतकी आहे.
0000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.