** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Sunday, July 19, 2020

आजअखेर 984 जणांना डिस्चार्ज -डॉ. बी. सी. केम्पी पाटील



       कोल्हापूर,दि. 19 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज सकाळी 10 वाजेपर्यंत 631 प्राप्त अहवालापैकी 488 निगेटिव्ह तर 49 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (17 जणांचा दुसराही अहवाल  पॉझीटिव्ह आला आहे.) 5 अहवाल नकारण्यात आले तर 72 अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 2141 पॉझीटिव्हपैकी 984 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 1107 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
       आज सकाळी 10 वाजेपर्यंत प्राप्त 49 पॉझीटिव्ह अहवालापैकी चंदगड-1, गडहिंग्लज -2, हातकणंगले- 1, कागल-1, करवीर-9, पन्हाळा-5, शिरोळ-2, नगरपालिका क्षेत्र- 15, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 12 व इतर राज्य व जिल्हा-1 असा समावेश आहे.
आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 97, भुदरगड- 83, चंदगड- 248, गडहिंग्लज- 152, गगनबावडा- 7, हातकणंगले- 71, कागल- 67, करवीर- 228, पन्हाळा- 88, राधानगरी- 84, शाहूवाडी- 221, शिरोळ- 60, नगरपरिषद क्षेत्र- 442, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-252 असे एकूण 2100 आणि जिल्हा व राज्यातील 41 असे मिळून एकूण 2141 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
            जिल्ह्यातील एकूण 2141 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 984 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 50 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 1107 इतकी आहे.
0000000


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.