इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शनिवार, २५ जुलै, २०२०

लॉकडाऊनमध्ये सोमवारपासून शिथिलता सविस्तर नियमावली होणार आज जाहीर - पालकमंत्री सतेज पाटील


कोल्हापूर, दि. 25 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये सोमवारपासून निश्चित शिथिलता देण्यात येणार असून त्याबाबतची नियमावली उद्या रविवारी जाहीर होणार असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज दिली.

 पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, 20 जुलैपासून जिल्ह्यात कडकडीत लॉकडाऊन पाळण्यात आला. उद्या रविवारी त्याची मुदत संपणार आहे. नागरिकांनी लॉकडाऊनच्या या प्रशासनाच्या विनंतीला मान देवून पाळला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. लॉकडाऊनच्या दरम्यान ज्या उपाययोजना करणे अपेक्षित होतं त्या करण्याचा प्रामाणिक प्रयत्न प्रशासनाने केला आहे. या लॉकडाऊनची मुदत उद्या रविवारी संपते. सोमवारपासून या लॉकडाऊनमध्ये निश्चितपणे आपण शिथिलता आणत आहोत. कोणत्या गोष्टी किती वेळेपर्यंत खुल्या राहणार आहेत. याचा सविस्तर आदेश उद्या जाहीर करण्यात येईल.

 नागरिकांनी जे अनुभव घेतलेले आहेत यावर आता पथ्य पाळणे गरजेचे आहे, असे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले मास्क सक्तीने वापरणे गरजेचं आहे. सामाजिक अंतराचे योग्य नियोजन करणं आवश्यक आहे. समूह संसर्गामध्ये अंत्यविधीला गेल्याच्या गोष्टी पुढे आल्या आहेत. वाढदिवसामुळे एकत्र आल्याने संसर्ग वाढण्याचेही निदर्शनास आले आहे. हातावरचे पोट असणाऱ्या लोकांचे अडचण होत आहे. रोजगाराची अडचण होत आहे त्यामुळे आम्ही लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणत आहोत. परंतु काहीही करण्यासाठी स्वातंत्र्य नाही याची खबरदारी सर्वांनी घ्यावी. शिथिलता आणल्यानंतर नियमांचे काटेकोरपालन करा. लढाई संपलेली नाही, सुरुच आहे. प्रशासन म्हणून आमचे सर्व प्रयत्न होते आणि राहणार आहेत, अशी ग्वाही   पालकमंत्री श्री. पाटील यांनी दिली.

 0 00 0 0 0

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.