** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Sunday, July 19, 2020

खचून न जाता विद्यार्थ्यांनी आपले मनोबल वाढवावे - उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत




कोल्हापूर, दि. 19 (जिल्हा माहिती कार्यालय) : खचून न जाता विद्यार्थ्यांनी आपले मनोबल वाढवून आलेल्या प्रसंगाला सामोरे जावे, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज सांगितले.
     करवीर तालुक्यातील वाशी येथील बाबासो पाटील यांच्या घरी भेट देवून त्यांनी कुटुंबियांचे सांत्वन केले. यानंतर ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले, झालेली घटना ही दुर्दैवी आहे. असा प्रकार पुन्हा घडू नये यसाठी १५-२० दिवसांत प्राचार्य आणि विद्यापिठातील संबंधितांशी चर्चा करुन निर्णय घेवू. विद्यार्थ्यांनी कोणताही टोकाचा निर्णय घेताना आपल्या घरच्यांचा विचार करावा. आलेल्या प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी खचून न जाता मनोबल वाढवावे, असेही ते म्हणाले.
0000



No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.