** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, July 24, 2020

वारंवार आजारपणासाठी उपचार घेणाऱ्या तरुणाची गडहिंग्लजमधील समर्पीत कोव्हिड आरोग्‍य केंद्रात आत्महत्या


कोल्हापूर, दि. 24 (जिल्हा माहिती कार्यालय) : वारंवार आजारपणासाठी विविध रुग्णालयामध्ये उपचार घेत असणाऱ्या तरुणाने आज गडहिंग्लज येथील  समर्पीत कोव्हिड आरोग्य केंद्रात आत्महत्या केली. याच्या स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आला होता, अशी माहिती पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम.व्ही.अथणी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.

  या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे, समर्पीत कोव्हिड आरोग्य केंद्र, शेंद्रीमाळ, गडहिंग्लज येथे एक कोव्हिड निगेटिव्ह व्यक्तीने गळफास घेवून आज दिनांक 24 जुलै रोजी 1.30 ते 2  च्या दरम्यान आत्महत्या केली. ही व्यक्ती त्यांच्या भावाबरोबर दिनांक 22 जुलै रोजी समर्पीत कोव्हिड आरोग्य केंद्र येथे दाखल झाली होती. या दोघांच्याही स्वॅबचा निगेटिव्ह अहवाल आज सकाळी प्राप्त झाला. त्यांनतर डिस्चार्ज देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली होती. तथापि दोघांनी जेवण करुन जातो असे त्या दोघांनी सांगितले. जेवणापूर्वी या व्यक्तीने टॉयलेटला जातो, असे सांगून टॉयलेटमध्ये गळफास घेवून आत्महत्या केली.

या व्यक्तींच्या भावाकडे चौकशी केली असता. आत्महत्या करणारी व्यक्ती वारंवार आजारपणासाठी विविध रुग्णालयामध्ये उपचार घेत होती. या घटनेची नोंद पोलीस ठाणे गडहिंग्लज येथे करण्यात आली आहे. मृत्यूनंतर त्या व्यक्तीचे रितसर शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

 0 00 0 0 0


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.