इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

मंगळवार, २८ जुलै, २०२०

ई-आर-1 विवरणपत्र 31 जुलै पर्यंत ऑनलाईन भरण्याचे आवाहन


          कोल्हापूर, दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय): जून 2020 रोजी संपणाऱ्या तिमाहीचे ई-आर-1 विवरणपत्र (त्रैमासिक) सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय व खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांकडून त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची मनुष्यबळाची सांख्यिकी माहिती (पुरुष / स्त्री एकूण) 31 जुलै पर्यंत वेबपोर्टलद्वारे ऑनलाईन पध्दतीने भरावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त ज.बा.करीम यांनी केले आहे.

यापुर्वीच या कार्यालयाकडून युझरनेम व पासवर्ड देण्यात आलेले आहेत. ई-आर 1 रिटर्नची सांख्यिकी माहिती प्रत्येक तिमाही नंतर प्रत्येक महिन्याच्या 1 ते 30 तारखेपर्यंत   भरणे आवश्यक आहे. सर्व आस्थापनांनी त्यांच्या कार्यालयाचे ई-आर-1 विवरण पत्र ऑनलाईन https//:rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर भरावयाचे आहे.

00000000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.