कोल्हापूर, दि. 29 (जिल्हा माहिती
कार्यालय): रूक्मिनीनगर परिसरात हॉटेल व्हिक्टर पॅलेस कॉर्नर ते दत्त मंदिर वळण ते
वायचळ रोडवर ॲङ शहा यांचे घर असा प्रवास करणाऱ्या सर्व वाहनांना हॉटेल व्हिक्टर
पॅलेस कॉर्नर या ठिकाणी प्रवेश बंद करण्याचा आदेश पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख
यांनी दिला.
तसेच
ॲङ शहा यांचे घर ते हॉटेल व्हिक्टर पॅलेस कॉर्नर हा मार्ग सर्व प्रकारच्या जड,
अवजड मालवाहू वाहनांकरिता प्रवेश बंद राहिल. या रस्त्यावर दोन्ही बाजूने दुचाकी, चारचाकी
व इतर हलकी वाहने यांची रहदारी मोठ्या प्रमाणावर होत असून अपघात होण्याची शक्यता
असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.