** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, July 21, 2020

अलमट्टीतून 46130 क्युसेक विसर्ग राधानगरीतून 800; 10 बंधारे पाण्याखाली




          कोल्हापूर, दि. 21 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 152.32 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वा. च्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 800 तर अलमट्टी धरणातून 46130 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे.
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, शिरोळ व तेरवाड, भोगावती नदीवरील - सरकारी कोगे व खडक कोगे, दुधगंगा नदीवरील- दत्तवाड असे एकूण 10 बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात 49.17 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 87.992 इतका पाणीसाठा आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये  पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 53.89 दलघमी, वारणा 607.68 दलघमी, दूधगंगा 462.58 दलघमी, कासारी 47.01 दलघमी, कडवी 38.03 दलघमी, कुंभी 47.91 दलघमी, पाटगाव 72.05 दलघमी, चिकोत्रा 21.91 दलघमी, चित्री 26.71 दलघमी, जंगमहट्टी 21.93 दलघमी, घटप्रभा  44.17 दलघमी, जांबरे 23.23 दलघमी, कोदे (ल पा) 6.06 दलघमी असा आहे.
            तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 19.7 फूट, सुर्वे 18.10 फूट, रुई 47 फूट, इचलकरंजी 45 फूट, तेरवाड 43.6 फूट, शिरोळ 33.6 फूट, नृसिंहवाडी 29.6 फूट, राजापूर 18.6 फूट तर नजीकच्या सांगली 7.9 फूट व अंकली 9.2 फूट अशी आहे.
00000


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.