कोल्हापूर, दि. 29 (जिल्हा
माहिती कार्यालय): फेब्रुवारी/मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 12 वी च्या
गुणपत्रिकांचे दि. 31 जुलै रोजी दुपारी 3 वा. पासून संबंधित महाविद्यालयात वितरण
करण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव एस.एम.
आवारी यांनी दिली.
उच्च
माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) फेब्रुवारी/मार्च 2020 च्या गुणपत्रिका सर्व
कनिष्ठ महाविद्यालयांना दि. 31 जुलै रोजी सकाळी 11 वा. त्यांना नेमून दिलेल्या
वितरण केंद्रावरून वाटप करण्यात येणार आहेत. संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांनी 31
जुलै रोजी दु. 3 वा. पासून विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार व सोईनुसार
शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सर्व नियमांचे व सुचनांचे पालन करून गुणपत्रक वितरण
करावे. विद्यार्थ्यांना विशिष्ठ तारखेलाच गुणपत्रक घेऊन जाण्याबाबत आग्रह धरू नये.
कनिष्ठ महाविद्यालयामध्ये पालक/विद्यार्थी यांची एकाच वेळी गर्दी होणार नाही याची
दक्षता घेऊन गुणपत्रकांचे वाटप करण्याचे आवाहनही श्री. आवारी यांनी केले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.