कोल्हापूर,दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय) : जयसिंगपूर येथील मोदी हास्पिटल येथे
कोणताही दगडफेकीचा प्रकार घडलेला नाही, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर
काळे यांनी दिली.
दत्तवाड येथील नदाफ कुटुंबाचे ८ सदस्य कोविड उपचाराकरता जयसिंगपूर
येथील मोदी हॉस्पीटल येथे दाखल आहेत. येथील पायोस हॉस्पिटलमध्ये त्यांचे एक
नातेवाईक उपचार करता दाखल असून ते मयत झाल्याबाबत चुकीची
माहिती त्यांना कोणाकडून तरी समजली. तेव्हा मोदी हास्पिटल येथे दाखल
असलेल्या एका मुलीस चक्कर आली. त्यामुळे नदाफ कुटुंबातील सदस्य
हॉस्पिटलमधून बाहेर येऊन, आम्हाला कोणतेही कोरोना लक्षणे नाहीत. आम्हाला तात्काळ
सोडून द्या. असे म्हणू लागले. या ठिकाणी दगडफेकीचा कोणताही प्रकार घडलेला नाही असे
श्री. काळे यांनी सांगितले.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.