इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शुक्रवार, २४ जुलै, २०२०

आजअखेर 1136 जणांना डिस्चार्ज -डॉ. बी. सी. केम्पी पाटील


       कोल्हापूर,दि. 24 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज सकाळी 10 वाजेपर्यंत 406 प्राप्त अहवालापैकी 292 निगेटिव्ह तर 83 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (12 जणांचा दुसराही अहवाल पॉझीटिव्ह तर 19 अहवाल नाकारण्यात आले आहे.) प्रतिजन चाचणीचे 10 प्राप्त अहवालापैकी 7 निगेटिव्ह आहेत, तर 3 पॉझीटिव्ह असे एकूण 86 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 3393 पॉझीटिव्हपैकी 1136 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 2161 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.

          आज सकाळी 10 वाजेपर्यंत प्राप्त 86 पॉझीटिव्ह अहवालापैकी भुदरगड-1, हातकणंगले- 3, करवीर-17, पन्हाळा-4, राधानगरी-5, शाहूवाडी-4, शिरोळ-1, नगरपालिका क्षेत्र- 9, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 42 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 104, भुदरगड- 94, चंदगड- 328, गडहिंग्लज- 185, गगनबावडा- 7, हातकणंगले- 214, कागल- 75, करवीर- 382, पन्हाळा- 144, राधानगरी- 109, शाहूवाडी- 237, शिरोळ- 92, नगरपरिषद क्षेत्र- 751, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-617 असे एकूण 3339 आणि इतर जिल्हा व राज्यातील 54 असे मिळून एकूण 3393 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 3393 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 1136 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 96 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 2161 इतकी आहे.

0000000

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.