** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Sunday, July 26, 2020

बकरी ईद शासनाच्या सूचनेनुसार साजरी करा - जिल्हाधिकारी दौलत देसाई


कोल्हापूर, दि. 26 (जिल्हा माहिती कार्यालय): कोव्हिड 19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमध्ये गृह विभागाच्या 17 जुलै 2020 च्या मार्गदर्शक सूचनेनुसार बकरी ईद साजरी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई केले आहे.

या शासन परिपत्रकात कोव्हिड-19 मुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. बकरी ईदची नमाज मस्जिद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी न करता, नागरिकांनी आपल्या घरीच साजरी करावी.

सध्या कार्यान्वीत असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन पध्दतीने अथवा दूरध्वनीवरून खरेदी करावीत.

नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सध्या लागू करण्यात आलेले निर्बंध कायम राहतील, त्यामध्ये बकरी ईद निमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही.

          बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, किंवा एकत्र जमू नये.

          कोरोनाला प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण इ. विभाग तसेच महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. प्रत्यक्ष सण सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे अनुपालन करावे.

0000000


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.