** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, June 9, 2020

15 जून अखेर राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावेत - डॉ. चंद्रशेखर साखरे



            कोल्हापूर, दि. 9 (जिल्हा माहिती कार्यालय) : राष्ट्रीय युवा पुरस्कार सन 2017-18 व 2018-19 साठी प्रस्ताव 15 जून 2020 अखेर सादर करण्याचे आवाहन कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी केले आहे.
       15 ते 29 या वयोगटाच्या युवक, युवती यांनी केलेल्या सामाजिक कार्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी राष्ट्रीय युवा पुरस्कार केंद्र शासनाची योजना कार्यान्वित आहे. यासाठी गेल्या तीन वर्षाच्या कामगिरीचे मुल्यांकन करून केंद्र शासनाच्यावतीने हा पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या शासकीय, निमशासकीय सेवेतील कर्मचारी, अधिकारी, विद्यापीठ, शैक्षणिक संस्थामधील कर्मचारी या पुरस्कारासाठी पात्र नाहीत.
या पुरस्कारासाठी https://innovate.mygov.in/national-youth-awards-2018/ , https://innovate.mygov.in/national-youth-awards-2019/ या संकेतस्थळावर प्रस्ताव सादर करावयाचे असून एक प्रत जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या dsokop@gmail.com या ईमेल आयडीवर पाठविणे आवश्यक आहे. या राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक, युवतींनी 15 जून अखेर प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी केले आहे.
0 0 0 0 0 0 0

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.