कोल्हापूर,दि.
10 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात आजअखेर 692 रूग्णांपैकी 530 जणांना
डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज सकाळी 10 वाजेपर्यंत 199 प्राप्त अवालापैकी 3 अहवाल
पॉझीटिव्ह, 193 अहवाल निगेटिव्ह (692 पैकी यापूर्वीच्या दोघांचा दुसरा अहवालही
पॉझिटिव्ह तर सोलापूर जिल्ह्यातील एक अहवाल निगेटिव्ह आहे, असे मिळून एकूण 3)
आले आहेत. आजअखेर जिल्ह्यात एकूण 154 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
आज सकाळी 10
वाजेपर्यत प्राप्त 3 पॉझीटिव्ह अहवालामध्ये गडहिंग्लज -1, कागल-1 व शाहुवाडी-1 असा
समावेश आहे.
आजअखेर तालुका, नपा आणि मनपा
क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 74, भुदरगड- 68, चंदगड- 74,
गडहिंग्लज- 79, गगनबावडा- 6, हातकणंगले- 7, कागल- 57, करवीर- 14, पन्हाळा- 25,
राधानगरी- 63, शाहुवाडी- 175, शिरोळ- 7, नगरपरिषद क्षेत्र- 11, कोल्हापूर
महापालिका क्षेत्र-24 असे एकूण 684 आणि
पुणे -1, सोलापूर-3, मुंबई-1, कर्नाटक-2 आणि
आंध्रप्रदेश-1 असे इतर जिल्हा व राज्यातील 8 असे मिळून एकूण 687 रुग्णांची आजअखेर
जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण 692 रूग्णांपैकी 530
रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 8 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर
उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 154 इतकी आहे.
0 0 0 0 0 0
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.