कोल्हापूर,दि.
10 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात आजअखेर 693 रूग्णांपैकी 571 जणांना
डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज रात्री 8 वाजेपर्यंत 73 प्राप्त अवालापैकी 1 अहवाल
पॉझीटिव्ह, 70 अहवाल निगेटिव्ह, 1 अहवाल नाकारण्यात आला व 1 निगेटिव्ह अहवाल मुंबई
येथील आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 114 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा
शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
आज रात्री 8
वाजेपर्यत प्राप्त 1 पॉझीटिव्ह अहवालामध्ये गडहिंग्लज -1 तालुक्यातील आहे.
आजअखेर तालुका, नपा आणि मनपा
क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 74, भुदरगड- 68, चंदगड- 74,
गडहिंग्लज- 80, गगनबावडा- 6, हातकणंगले- 7, कागल- 57, करवीर- 14, पन्हाळा- 25,
राधानगरी- 63, शाहुवाडी- 175, शिरोळ- 7, नगरपरिषद क्षेत्र- 11, कोल्हापूर
महापालिका क्षेत्र-24 असे एकूण 685 आणि
पुणे -1, सोलापूर-3, मुंबई-1, कर्नाटक-2 आणि आंध्रप्रदेश-1 असे इतर जिल्हा व
राज्यातील 8 असे मिळून एकूण 693 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण 693 रूग्णांपैकी 571
रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 8 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर
उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 114 इतकी आहे.
0 0 0 0 0 0
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.