कोल्हापूर, दि. 13 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील
राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पर्यायी
मार्गाने वाहतूक वळविण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे
सहाय्यक अधीक्षक अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली.
करवीर
तालुक्यातील शिंगणापूर रामा-194 तसेच
शिंगणापूर केटीवेअर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद.
हातकणंगले
तालुक्यातील इचलकरंजी नवीन
पुलावरुन वाहतूक सुरू.
शिरोळ
तालुक्यातील शिरढोण पुलावर
पाणी आल्याने नांदणी जयसिंगपूर मार्गे वाहतूक सुरु. धरणगुत्ती गावाजवळ पाणी
आल्याने जयसिंगपूर मार्गे वाहतूक सुरू.
कागल
तालुक्यातील सर पिराजीराव
तलावातील पाणी रस्त्यावर आल्याने हासुर, बोळावी, ठाणेवाडी व देवगड, राधानगरी,
मुरगुड मार्गे वाहतूक सुरु. चिखली गावाजवळ रस्त्यावर पाणी आल्याने कौलगे हमीदवाडा
खडकेवाडा मार्गे वाहतूक सुरु.
पन्हाळा
तालुक्यातील केर्ली जोतिबा
रस्ता खचल्याने गायमुख वळण रस्त्यावरून मार्गे वाहतूक सुरू.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.