अर्सेनिक अल्बम 30 व संशमनी वटीचे नागरिकांना मोफत वाटप
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व
पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज शुभारंभ
कोल्हापूर, दि. 14 (जिल्हा माहिती कार्यालय): महाराष्ट्रातील
ग्रामीण भागातील जनतेला रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे होमिओपॅथिक औषध अर्सेनिक अल्बम
30 व संशमनी वटी हे आयुर्वेदिक औषध मोफत वाटप करण्यात येणार आहे. उद्या शनिवार 15
ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहात ग्रामविकास
मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व पालकमंत्री सतेज उर्फ बंटी डी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली
हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी
रविकांत आडसूळ यांनी दिली.
यामध्ये
वय वर्षे 5 ते 55 या वयोगटातील एकूण 23,31,199 नागरिकांना अर्सेनिक अल्बम 30 वाटप आणि
वय वर्ष 55 वयोगटावरील एकूण 4,50,617 नागरिकांना अर्सेनिक अल्बम 30 व संशमनी वटी वाटप
केले जाणार आहे. तरी जिल्हातील सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा.
जिल्हा परिषद सदस्य
व पंचायत समिती सभापतींना टॅबचे वाटप
जिल्हा परिषदेचे स्वनिधी मधून जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सभापती
यांना घेण्यात आलेल्या टॅबचे वाटप केले जाणार आहे. यामध्ये प्रातिनिधीक स्वरुपात मान्यवरांच्या
हस्ते वाटप होणार आहे.
कोविड 19 या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद कामकाज ऑनलाईन पध्दतीने करण्यासाठी,
शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळणे, व्हीडिओ कॉन्फरन्सींगव्दारे विविध सभांमध्ये
सहभाग घेणे यासाठी सर्व जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सभापती यांचेसाठी टॅब उपलब्ध
करुन देणेबाबत शासनाची मान्यता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेली आहे.
0000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.