** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, August 14, 2020

द्वारकानाथ कोटणीस आयसोलेशन रूग्णालयाच्या नुतनीकरणाचे आज उद्घाटन

 

द्वारकानाथ कोटणीस आयसोलेशन रूग्णालयाच्या नुतनीकरणाचे आज उद्घाटन

 

कोल्हापूर, दि. 14 (जिल्हा माहिती कार्यालय): महापालिकेच्या द्वारकानाथ कोटणीस आयसोलेशन रूग्णालयाच्या नुतनीकरणाचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या विशेष उपस्थितीत उद्या 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता होणार आहे.

       या उद्घाटन सोहळ्यास महापौर निलोफर आजरेकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे डॉ. योगेश जाधव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार संजय मंडलिक, आमदार दत्तात्रय सावंत, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल आदी उपस्थित राहणार आहेत.

0000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.