** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, August 13, 2020

आजअखेर 5166 जणांना डिस्चार्ज -डॉ. बी. सी. केम्पी पाटील

 

   कोल्हापूर,दि. 13 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 845 प्राप्त अहवालापैकी 509 निगेटिव्ह तर 354 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 675 प्राप्त अहवालापैकी निगेटिव्ह 587 तर 88 पॉझीटिव्ह (27 निगेटिव्ह अहवाल आरटीपीसीआर साठी तपासणीसाठी पाठविले), खासगी रुग्णालये/लॅब मधील 118 पॉझीटिव्ह आले असे एकूण 560 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 12838 पॉझीटिव्हपैकी 5166 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 7319 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 560 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-8, भुदरगड- 2, चंदगड-9, गडहिंग्लज-16, हातकणंगले-96, कागल-3, करवीर-63, पन्हाळा- 4, राधानगरी-10, शाहूवाडी-7, शिरोळ- 30, नगरपरिषद क्षेत्र- 120, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-191 व इतर शहरे व राज्य 1 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-238, भुदरगड- 294, चंदगड- 438 गडहिंग्लज- 339, गगनबावडा- 31, हातकणंगले-1395, कागल- 245, करवीर- 1361, पन्हाळा- 447, राधानगरी- 349, शाहूवाडी- 367, शिरोळ- 594, नगरपरिषद क्षेत्र-2670, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-3879 असे एकूण 12644 आणि इतर जिल्हा व राज्यातील - 194 असे मिळून एकूण 12838 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 12838 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 5166 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 353 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 7319 इतकी आहे.

000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.