** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, August 4, 2021

जिल्ह्यातील 19 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 7112 क्युसेक विसर्ग

 


 

          कोल्हापूर, दि. 4 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 236.79 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 1400 व सिंचन विमोचकातून 5712  असा एकूण 7112 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ. भोगावती नदी- हळदी, सरकारी कोगे व खडक कोगे. वारणा नदी- चिंचोली, माणगाव व खोची. कासारी नदी- यवलूज, पुनाळ-तिरपन व ठाणे-आळवे. दुधगंगा नदी- दत्तवाड, बाचणी व सिद्धनेर्ली असे एकूण 19 बंधारे पाण्याखाली आहेत.

जिल्ह्यातील धरणांमध्ये  तुळशी -87.65 दलघमी, वारणा -860.97, दूधगंगा – 603.03, कासारी- 60.35, कडवी -71.24, कुंभी-62.48, पाटगाव97.48, चिकोत्रा- 39.97, चित्री - 53.41 (पूर्ण क्षमतेने भरला),  जंगमहट्टी -34.65, घटप्रभा -  44.17,  जांबरे- 23.23, आंबेआहोळ - 30.98 दलघमी इतका पाणीसाठा शिल्लक आहे.

          तर बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे - राजाराम 24.8 फूट, सुर्वे 24.8, रुई 55, इचलकरंजी 51.6, तेरवाड 49.8, शिरोळ 43 तर नृसिंहवाडी  बंधाऱ्याची 46 फूट इतकी पाणी पातळी  सध्या आहे.

00000

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.