** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, August 25, 2021

प्रवर अधीक्षक कार्यालयामध्ये डाक अदालतीचे आयोजन

 


 कोल्हापूर, दि. 25 (जिल्हा माहिती कार्यालय): प्रवर अधीक्षक डाकघर, कोल्हापूर यांच्यामार्फत सोमवार दि. 30 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वा. प्रवर अधीक्षक कार्यालयात डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रवर अधीक्षक रुपेश सोनावले यांनी दिली. 

          डाकघर विभागाशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी  किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्याच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतमध्ये दखल घेतली जाईल. विशेषत: टपाल वस्तू/ मनीऑर्डर/ बचत खाते/ प्रमाणपत्र इ. बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा. संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार रुपेश सोनावले, प्रवर अधीक्षक डाकघर, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर- 416003 यांच्या नावे दोन प्रतींसह दि. 9 सप्टेंबर पर्यंत अथवा तत्पूर्वी पोहोचेल अशा रितीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची या डाक आदलतीमध्ये दखल घेतली जाणार नाही, असे पत्रकाव्दारे कळविले आहे.

00000

         

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.