** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, August 5, 2021

आजअखेर 1 लाख 85 हजार 466 जणांना डिस्चार्ज

 


 

कोल्हापूर, दि. 5 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 2836 प्राप्त अहवालापैकी 2795 अहवाल निगेटिव्ह तर 31 अहवाल पॉझिटिव्ह (10 अहवाल नाकारण्यात आला). अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 1568 प्राप्त अहवालापैकी 1476 अहवाल निगेटिव्ह तर 92 अहवाल पॉझिटिव्ह ( 131 अहवाल आरटीपीसीआरला पाठवण्यात आले आहेत).  खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 16253 प्राप्त अहवालापैकी 15563 निगेटिव्ह तर 690 पॉझीटिव्ह असे एकूण 813 अहवाल पॉझीटिव्ह आहेत तर एकूण 7 रूग्णांचा मृत्यू झाला आहे

           जिल्ह्यात आज अखेर एकूण 1 लाख 96 हजार 720 पॉझीटिव्हपैकी 1 लाख 85 हजार 466 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज अखेर जिल्ह्यात एकूण 5 हजार 729 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

           आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 813 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-12, भुदरगड-1, चंदगड-22, गडहिंग्लज-45, गगनबावडा-0 हातकणंगले-83, कागल-26, करवीर-163, पन्हाळा-113, राधानगरी-39, शाहूवाडी-75, शिरोळ-61, नगरपरिषद क्षेत्र-67, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-102, इतर जिल्हा व राज्यातील-4 असा समावेश आहे.

           आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-5280, भुदरगड- 5071, चंदगड- 3830, गडहिंग्लज- 7233, गगनबावडा-717, हातकणंगले-22076, कागल-7661, करवीर-30286, पन्हाळा-10375, राधानगरी-4913, शाहूवाडी-4666, शिरोळ- 12727, नगरपरिषद क्षेत्र-21218, कोल्हापूर महापालिका 51 हजार 809 असे एकूण 1 लाख 87 हजार 862 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 8 हजार 858 असे मिळून एकूण 1 लाख 96 हजार 720 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

             जिल्ह्यातील एकूण 1 लाख 96 हजार 720 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 1 लाख 85 हजार 466  रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 5 हजार 525 जणांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 5 हजार 729  इतकी आहे.

000000

 

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.