** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, August 27, 2021

ऑटोरिक्षा परवानाधारकांनी सानुग्रह अनुदानाचा लाभ घ्यावा

 

 


कोल्हापूर, दि. 27 (जि.मा.का.) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक दुर्बल घटकांसाठी शासनाने अनुदान देण्याचे जाहीर केले होते. त्याअनुषंगाने ऑटोरिक्षा परवानाधारकांना 1500 रू. अनुदान देण्यात येत आहे. आज रोजी ज्या परवानाधारकांना अनुदान मिळाले नाही त्यांच्याकरिता प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर येथे कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष परवानाधारकाने कागदपत्रे सादर करून अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी दिपक पाटील यांनी केले आहे.

       वाहन नोंदणी प्रमाणपत्र, वाहन मालकीची अनुज्ञप्ती, वाहनाचा परवाना, आधार कार्ड, रद्द केलेला धनादेश/ बँक पासबुक (ज्याच्यावर वाहनधारकाचे नाव असेल ज्याच्या आधार बँक खाते नंबर व आयएफएससी कोड प्राप्त होईल.) इ. कागदपत्रे सादर करावीत.

000000

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.