** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, August 18, 2021

जिल्ह्यातील 2 बंधारे पाण्याखाली राधानगरीतून 1400 क्युसेक्सचा विसर्ग

 

          कोल्हापूर, दि. 18 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 223.67 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पंचगंगा नदीवरील- रुई व इचलकरंजी असे एकूण 2 बंधारे पाण्याखाली आहेत.

जिल्ह्यातील धरणांमध्ये  राधानगरी-223.67 तुळशी -96.22, वारणा -885.08, दूधगंगा-653.14, कासारी- 65.97, कडवी -71.24 (पूर्ण क्षमतेने भरला), कुंभी-66.62, पाटगाव 97.87, चिकोत्रा- 41.73, चित्री - 53.12 (पूर्ण क्षमतेने भरला),  जंगमहट्टी -32.80, घटप्रभा -  33.52, जांबरे- 23.23(पूर्ण क्षमतेने भरला), आंबेआहोळ - 30.98 इतका दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.

          तर बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे -राजाराम 15.2 फूट, सुर्वे 17.11, रुई 43.3, इचलकरंजी 41, तेरवाड 39, शिरोळ 30.3  तर नृसिंहवाडी  बंधाऱ्याची  27.3 फूट इतकी पाणी पातळी आहे.

00000

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.