** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, August 5, 2021

जिल्ह्यातील 27 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 1400 क्युसेक विसर्ग

 

          कोल्हापूर, दि. 5 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 234.49 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ. भोगावती नदी- हळदी, राशिवडे, सरकारी कोगे, खडक कोगे व तारळे. वारणा नदी- चिंचोली, माणगांव व खोची. कासारी नदी- यवलूज, पुनाळ-तिरपन व ठाणे-आळवे. दुधगंगा नदी- दत्तवाड व सिद्धनेर्ली. वेदगंगा नदी-  निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, सुरुपली व चिखली.  कुंभी नदी-  कळे असे एकूण 27 बंधारे पाण्याखाली आहेत.

जिल्ह्यातील धरणांमध्ये  तुळशी -89.23 दलघमी, वारणा -875.86, दूधगंगा – 617.02, कासारी- 62.61, कडवी -71.24, कुंभी-63.01, पाटगाव 97.87, चिकोत्रा- 40.47, चित्री - 53.41 (पूर्ण क्षमतेने भरला),  जंगमहट्टी -34.65, घटप्रभा -  44.17,  जांबरे- 23.23, आंबेआहोळ - 30.98 दलघमी इतका पाणीसाठा शिल्लक आहे.

            तर बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे - राजाराम 29.9 फूट, सुर्वे 28.4, रुई 56.9, इचलकरंजी 54.4, तेरवाड 46.6, शिरोळ 39.1 तर नृसिंहवाडी  बंधाऱ्याची 40 फूट इतकी पाणी पातळी  सध्या आहे.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.