** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Saturday, August 14, 2021

आजअखेर 1 लाख 91 हजार 194 जणांना डिस्चार्ज

 


             कोल्हापूर, दि. 14 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी  5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 4943 प्राप्त अहवालापैकी 4916 अहवाल निगेटिव्ह तर 17 अहवाल पॉझिटिव्ह (10 अहवाल नाकारण्यात आले). अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 1319 प्राप्त अहवालापैकी 1199 अहवाल निगेटिव्ह तर 120 अहवाल पॉझिटिव्ह (325 अहवाल आरटीपीसीआरला पाठवण्यात आले आहेत). खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 9528 प्राप्त अहवालापैकी 9291 निगेटिव्ह तर 237 पॉझीटिव्ह असे एकूण 374 अहवाल पॉझीटिव्ह आहेत तर एकूण 10 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

            जिल्ह्यात आज अखेर एकूण 2 लाख 731 पॉझीटिव्हपैकी 1 लाख 91 हजार 194 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज अखेर जिल्ह्यात एकूण 3 हजार 924 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

            आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 374 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-7, भुदरगड-1, चंदगड-0, गडहिंग्लज-16, गगनबावडा-0 हातकणंगले-52, कागल-11, करवीर-58, पन्हाळा-21, राधानगरी-6, शाहूवाडी-20, शिरोळ-45, नगरपरिषद क्षेत्र-59, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-75, इतर जिल्हा व राज्यातील-3 असा समावेश आहे.

            आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-5349, भुदरगड- 5082, चंदगड- 3872, गडहिंग्लज- 7395, गगनबावडा-720, हातकणंगले-22695, कागल-7852, करवीर-30968, पन्हाळा-10586, राधानगरी-4952, शाहूवाडी-4848, शिरोळ- 13237, नगरपरिषद क्षेत्र-21687, कोल्हापूर महापालिका 52 हजार 484 असे एकूण 1 लाख 91 हजार 803 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 8 हजार 928 असे मिळून एकूण 2 लाख 731 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 2 लाख 731 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 1 लाख 91 हजार 194 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 5 हजार 613 जणांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 3 हजार 924 इतकी आहे.

000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.