** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, August 12, 2021

जिल्ह्यातील 2 बंधारे पाण्याखाली राधानगरीतून 1400 क्युसेक्सचा विसर्ग

 

          कोल्हापूर, दि. 12 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 228.02 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पंचगंगा नदीवरील- रुई व इचलकरंजी असे एकूण 2 बंधारे पाण्याखाली आहेत.

जिल्ह्यातील धरणांमध्ये  राधानगरी-228.02 तुळशी -93.76, वारणा -877.01, दूधगंगा-631.76, कासारी- 61.25, कडवी -71.24(पूर्ण क्षमतेने भरला), कुंभी-62.81, पाटगाव 98.35, चिकोत्रा- 40.98, चित्री - 53.30 (पूर्ण क्षमतेने भरला),  जंगमहट्टी -34.02, घटप्रभा -  37.70, जांबरे- 23.23(पूर्ण क्षमतेने भरला), आंबेआहोळ - 30.98 इतका दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.

          तर बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे -राजाराम 14.5 फूट, सुर्वे 17.1, रुई 42.6, इचलकरंजी 39.6, तेरवाड 38.5, शिरोळ 30 तर नृसिंहवाडी  बंधाऱ्याची  27.6 फूट इतकी पाणी पातळी आहे.

00000

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.