** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, August 25, 2021

शेतकऱ्यांनी महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करावेत

 


कोल्हापूर, दि. 25 (जिल्हा माहिती कार्यालय) : सन 2021-22 मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- अन्नधान्य पिके अंतर्गत रब्बी हंगामामध्ये प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके, सुधारीत कृषि औजारे सिंचन साधने या बाबींसाठी इच्छुक शेतकऱ्यांनी महाडिबीटी  प्रणालीद्वारे अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी  केले आहे.

    राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- अन्नधान्य पिके अंतर्गत, या जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामात कडधान्य कार्यक्रमांतर्गत हरभरा पौष्टिक तृणधान्य कार्यक्रमांतर्गत ज्वारी पिकांसाठी राबविण्यात येत आहे.

बियाणे वितरण- जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामात हरभरा बियाण्यासाठी 10 वर्षाच्याआतील वाणास 25 रू. प्रती किलो, 10 वर्षावरील वाणास 12 रू. प्रति किलो रब्बी ज्वारी बियाण्यासाठी 10 वर्षाच्याआतील वाणास 30 रू. प्रति किलो, 10 वर्षावरील वाणास 15 रू. प्रति किलो अनुदान देय आहे.

    एकूण किंमतीच्या 50 टक्के मर्यादेत अनुदान देय आहे. प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला 2 हेक्टर मर्यादेत लाभ देय आहे.

   पीक प्रात्यक्षिके - पीक प्रात्यक्षिकासाठी एका शेतक-याला 1 एकर मर्यादेत निविष्ठा स्वरूपात अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. बियाणे, जैविक खते, सुक्ष्म मुलद्रव्ये, भू सुधारके पीक संरक्षण औषधे या निविष्ठांसाठी शेतक-याला एक एकरच्या मर्यादेत एका पिकासाठी संबंधित पिकाच्या प्रकारानुसार 2 ते 4 हजार रू. प्रती एकर मर्यादेत डीबीटी तत्त्वावर अनुदान अदा करण्यात येणार आहे. यासाठी कृषि विद्यापीठांच्या शास्त्रज्ञांच्या सल्ल्याने जिल्हानिहाय पॅकेज तयार करण्यात येत असून संपूर्ण पॅकेजचा वापर करणे अनिवार्य आहे.

     पीक प्रात्यक्षिके शेतकरी गटांमार्फत राबविली जाणार असल्याने पीक प्रात्यक्षिकांसाठी अर्ज करताना संबंधित कृषि सहाय्यकांशी संपर्क करून 10 हेक्टर क्षेत्र असणाऱ्या गटांनी नोंदणी करावी. शेतक-यांना नोंदणी करण्यासाठी 30 ऑगस्ट ते 10 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात येत आहे. विहित मुदतीत नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांचाच विचार केला जाईल. शेतक-यांची निवड ऑनलाईन लॉटरी पध्दतीने होणार आहे.

00000000


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.