** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, August 3, 2021

तृतीयपंथीयांनी ओळखपत्रासाठी अर्ज करावेत

 


 

कोल्हापूर, दि. 3 (जिल्हा माहिती कार्यालय): तृतीयपंथीयांचे कल्याण व हक्कांचे संरक्षण अंतर्गत पात्र तृतीयपंथीयांनी ओळख प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळविण्यासाठी नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन या वेबसाईटला भेट देवून अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीचे सदस्य सचिव तथा समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

जिल्ह्यातील तृतीयपंथीयांच्या समस्या तसेच तक्रारीसंदर्भात तक्रार निवारण समिती/ कक्षाची स्थापना करणे आवश्यक असल्याने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयान्वये तृतीयपंथीयांच्या प्राप्त तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा स्तरावर तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आली आहे.

तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण अधिनियम 2019 मधील नियम 2020 अंतर्गत विभाग 6 व 7 नुसार जिल्हास्तरीय समितीव्दारे तृतीयपंथीयांना त्यांचे ओळख प्रमाणपत्र  व ओळखपत्र अदा करण्याची तजविज आहे. त्याअनुषंगाने सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभाग, मंत्रालय, भारत सरकार, यांच्यामार्फत राष्ट्रीय तृतीयपंथीय पोर्टल सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पात्र तृतीयपंथीयांनी नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन (National Portal for Transgender Persons) या वेबसाईटवर भेट देवून ॲप्लाय ऑनलाईन (Apply Online) यावर आपला युजर आयडी व पासवर्ड तयार करून आपली सर्व माहिती भरावी. ऑनलाईन अर्जासोबत आयकार्ड साईज फोटो स्कॅन केलेली सही, आपण तृतीयपंथीय असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र, शासकीय रूग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ यांनी दिलेला अहवाल व इतर आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत संलग्न करावीत.

000000

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.