** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, August 10, 2021

जिल्ह्यातील 6 बंधारे पाण्याखाली राधानगरीतून 1400 क्युसेक्सचा विसर्ग

 


          कोल्हापूर, दि. 10 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 231.03 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पंचगंगा नदीवरील- राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी व तेरवाड. भोगावती नदी- खडक कोगे असे एकूण 6 बंधारे पाण्याखाली आहेत.

जिल्ह्यातील धरणांमध्ये  राधानगरी-231.03, तुळशी -93.10, वारणा -878.16, दूधगंगा – 628.87, कासारी- 61.25, कडवी -71.24(पूर्ण क्षमतेने भरला), कुंभी-63.10, पाटगाव 98.91, चिकोत्रा- 41.10, चित्री - 53.41 (पूर्ण क्षमतेने भरला),  जंगमहट्टी -34.43, घटप्रभा -  41.50,  जांबरे- 23.23(पूर्ण क्षमतेने भरला), आंबेआहोळ - 30.98 इतका दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.

          तर बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे - राजाराम 16.07 फूट, सुर्वे 18.02, रुई 44.06, इचलकरंजी 41, तेरवाड 39.06, शिरोळ 32 तर नृसिंहवाडी  बंधाऱ्याची  29.09 फूट इतकी पाणी पातळी आहे.

00000

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.