** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, August 3, 2021

जिल्ह्यातील 20 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 1400 क्युसेक विसर्ग

 

 

          कोल्हापूर, दि. 3 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 233.40 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ. भोगावती नदी- हळदी व खडक कोगे. वारणा नदी- चिंचोली, माणगाव, खोची व दानोळी. कासारी नदी- यवलूज, पुनाळ-तिरपन व ठाणे-आळवे. दुधगंगा नदी- दत्तवाड, बाचणी, सुळकुड व सिद्धनेर्ली असे एकूण 20 बंधारे पाण्याखाली आहेत.

जिल्ह्यातील धरणांमध्ये  तुळशी -86.18 दलघमी, वारणा -842.83, दूधगंगा – 592.03, कासारी- 58.08, कडवी – 71.24, कुंभी-61.09, पाटगाव- 96.12, चिकोत्रा- 39.34, चित्री - 53.41 (पूर्ण क्षमतेने भरला),  जंगमहट्टी -34.65, घटप्रभा -  44.17,  जांबरे- 23.23, आंबेआहोळ - 30.98 दलघमी इतका पाणीसाठा शिल्लक आहे.

            तर बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे - राजाराम 23.7 फूट, सुर्वे 25, रुई 57.6, इचलकरंजी 58.4, तेरवाड 56.6, शिरोळ 56.3 तर नृसिंहवाडी  बंधाऱ्याची 55.8 फूट इतकी पाणी पातळी  सध्या आहे.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.