** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, August 23, 2021

मुंबई येथे 116 वी डाक अदालत

 


कोल्हापूर, दि. 23 (जिल्हा माहिती कार्यालय) :  सर्कल स्तरावरील 116 वी डाक अदालत 29 सप्टेंबर रोजी मुख्य पोस्टमास्तर जनरल मुंबई यांच्या कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आली आहे.

महाराष्ट्र आणि गोवा राज्याशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतमध्ये दखल घेतली जाईल. विशेषत: टपाल वस्तु/मनी ऑर्डर/ बचत बँक खाते/ प्रमाणपत्र इत्यादीबाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा. उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठवली असेल त्याचे नाव व हुद्दा इ.

संबंधितांनी डाक सेवे बाबतची आपली तक्रार सहायक निदेशक डाकसेवा (ज.शि.) शान्तला भट्ट आणि सचिव, डाक अदालत, मुख्य पोस्टमास्टर जनरल यांचे कार्यालय, मुंबई जी.पी.ओ. इमारत, दुसरा माळा, मुंबई- 01 यांच्या नावे दोन प्रतीसह दि. 10 सप्टेंबर पर्यंत अथवा त्यापूर्वी पोहोचेल इशा रितीने पाठवावी त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही.

000000

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.