इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

बुधवार, ५ ऑगस्ट, २०२०

आजअखेर 3611 जणांना डिस्चार्ज -डॉ. बी. सी. केम्पी पाटील


       कोल्हापूर,दि. 5 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 1197 प्राप्त अहवालापैकी 329 निगेटिव्ह तर 614 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (96 अहवाल प्रलंबित, 43 जणांचा दुसराही अहवाल पॉझीटिव्ह, 14 अहवाल नाकारण्यात आले) अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 144 प्राप्त अहवालापैकी 106 निगेटिव्ह, 38 पॉझीटिव्ह, खासगी रुग्णालये/लॅब मधील 50 पॉझीटिव्ह तर 19 निगेटिव्ह अहवाल आरटी-पीसीआरला पाठविण्यात आले एकूण 702 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 8416 पॉझीटिव्हपैकी 3611 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 4576 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 702 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा- 16, भुदरगड- 35, चंदगड- 12, गडहिंग्लज-7, गगनबावडा-12, हातकणंगले- 70, कागल-1, करवीर- 61, पन्हाळा- 12, राधानगरी- 47, शाहूवाडी- 46, शिरोळ- 45, नगरपरिषद क्षेत्र- 140, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-188 व इतर जिल्हा व राज्यातील - 10 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-186, भुदरगड- 244, चंदगड- 402, गडहिंग्लज- 274, गगनबावडा- 28, हातकणंगले- 778, कागल- 153, करवीर- 903, पन्हाळा- 331, राधानगरी- 296, शाहूवाडी- 324, शिरोळ- 342, नगरपरिषद क्षेत्र- 1697, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-2343 असे एकूण 8301 आणि इतर जिल्हा व राज्यातील - 115 असे मिळून एकूण 8416 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 8416 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 3611 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 229 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 4576 इतकी आहे.

000000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.