** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, July 8, 2020

जिल्ह्यातील 2 मार्ग बंद



कोल्हापूर, दि. 8 (जि.मा.का.) : पावसामुळे जिल्ह्यातील राज्यमार्ग 1 व प्रमुख जिल्हा मार्ग 1 असे 2 मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली.
करवीर तालुक्यातील कोल्हापूर शहराचा बाह्यवळण रस्ता कळंबे साळोखेनगर बालिंगे शिंगणापूर रामा-194 मार्गावरील शिंगणापूर केटीवेअर रस्त्यावर 1 फूट पाणी आल्याने वाहतुक बंद असून आंबेवाडी चिखली मार्गे पर्यायी वाहतुक सुरू आहे. 
आजरा तालुक्यातील प्रजिमा 52 पासून नवले देवकांडगाव, कोरिवडे, पेरणोली, साळगाव राम क्र. 188 ला मिळणारा प्रजिमा साळगाव बंधाऱ्यावर अर्धा फूट पाणी आल्याने वाहतुक बंद असून इजिमा 132 सोहाळे मार्गे वाहतुक सुरू आहे.
00000


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.