** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, July 8, 2020

हुमणी कीड प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन



                  कोल्हापूर,दि. 8 (जिल्हा माहिती कार्यालय) : पिकावरील हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व त्यावरील उपाय-योजनांसाठी शेतकऱ्यांनी घाबरून न जाता कृषि विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी केले आहे.
       हुमणी भुंगेरेसाठी सायंकाळनंतर प्रकाश सापळे लाऊन भुंगे नष्ट करावेत व शेताच्या बांधावर झाडावर कीटकनाशक फवारणी करून भुंगे नष्ट करावेत. हुमणी अळीसाठी रिजेंट एकरी (8 ते 10 किलो)व इमिडाक्लोप्रीड (3 किलो) एकत्र रासायनिक खतासोबत सरीमध्ये जमिनीआड करून हलके पाणी द्यावे. नंतर एक आठवड्यानंतर प्रती एकरी 4 किलो मेटारायझीयाम ओल्या 25-30 किलो शेणात 3-4 दिवस मुरत ठेऊन त्याची पातळ स्लरी करून पाण्यासोबतत सोडावे, असेही श्री. वाकुरे यांनी सांगितले आहे.
00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.