कोल्हापूर,दि. 8 (जिल्हा माहिती कार्यालय): आज सकाळी
10 वाजेपर्यंत 398 प्राप्त अहवालापैकी 381 निगेटिव्ह तर 16 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.
(एकाचा दुसरा अहवालही पॉझीटिव्ह आला आहे.) जिल्ह्यात आजअखेर एकूण 1028
पॉझीटिव्हपैकी 769 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 242
पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील
यांनी आज दिली.
आज सकाळी 10 वाजेपर्यंत प्राप्त 16 पॉझीटिव्ह
अहवालापैकी भुदरगड तालुक्यातील-1, चंदगड तालुक्यातील -1, हातकणंगले तालुक्यातील-1,
करवीर तालुक्यातील-1 पन्हाळा तालुक्यातील-1, शिरोळ तालुक्यातील-1, नगरपरिषद
क्षेत्रातील -6, कोल्हापूर महापालिका क्षेत्रात-3 आणि
रत्नागिरी जिल्ह्यातील-1 असा समावेश आहे.
आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या
पुढीलप्रमाणे - आजरा- 94, भुदरगड- 78, चंदगड- 118, गडहिंग्लज- 113, गगनबावडा- 7,
हातकणंगले- 20, कागल- 58, करवीर- 37, पन्हाळा- 30, राधानगरी- 73, शाहूवाडी- 187,
शिरोळ- 16, नगरपरिषद क्षेत्र- 113, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-62 असे एकूण 1006 आणि पुणे -2, सोलापूर-3, मुंबई-4, नाशिक -1, सातारा-2, रत्नागिरी-1, कर्नाटक-7,
आंध्रप्रदेश-1 आणि असे इतर जिल्हा व राज्यातील 22 असे मिळून एकूण 1028 रुग्णांची
आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण 1028 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 769
रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 17 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर
उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 242 इतकी आहे.
0 0 0 0 0 0
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.