कोल्हापूर, दि. 9 (जिल्हा
माहिती कार्यालय) : शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये यासोबतच आपला परिसर तंबाखू
मुक्त करण्यासाठी स्वयंशिस्तीने प्रतिबंध करावा. त्याचबरोबर तंबाखूजन्य पदार्थांचे
सेवन, थुंकने व धुम्रपान करुन उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देश
निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी दिले.
राष्ट्रीय
तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय व सनियंत्रण बैठक आज झाली.
या वेळी प्रभारी जिल्हा सल्लागार चारुशीला कणसे यांनी स्वागत करुन माहिती दिली. त्या
म्हणाल्या, डिसेंबर 2016 ते जून 2020 या कालावधीत आरोग्य विभागाने 493 जणांकडून 57
हजार 75 रुपये, पोलीस विभागाने 1107 जणांकडून 2 लाख 41 हजार 870 रुपये तर अन्न व
औषध प्रशासनाकडून 25 जणांकडून 72 हजार 675 रुपये असा एकूण 3 लाख 71 हजार 620 रुपये
दंड वसुल केला आहे. कोटपा कायद्याची अंमलबजावाणीसाठी कार्यशाळा घेण्यात येणार आहे.
येलो लाईन कँपेनिंग अंतर्गत तंबाखू मुक्ती शाळा अभियान अंतर्गत शाळेपासून 100
यार्ड परिसरात पिवळ्या रंगाचा पट्टा आखण्यात येणार आहे. सामाजिक कार्यकर्ता क्रांती
शिंदे यांनीही यावेळी दंडात्मक कारवाईची मोहीम सुरु केल्याची माहिती दिली.
निवासी
उपजिल्हाधिकारी श्री. गलांडे म्हणाले, तंबाखू जन्य पदार्थाच्या सेवनास, धुंकण्यास
व धम्रपानास प्रतिबंध करण्याबाबतच्या 29 मे 2020 रोजीच्या सार्वजनिक आरोग्य
विभागाच्या शासन निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. केवळ कागदावर तंबाखू मुक्त
शाळा आणि परिसर करण्यापेक्षा अंमलबजावणीवर अधिक भर द्यावा. नागरिकांनीही
स्वयंशिस्त पाळून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी द्या तंबाखू व ई
सिगारेटला नकार, करा सुदृढ आरोग्याचा स्वीकार, असे सांगत तंबाखू मुक्तीची शपथही
घेण्यात आली.
याबैठकीला
जिल्हा शिल्यचिकित्सक डॉ. बी.सी. केम्पीपाटील, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त
मोहन केंबळकर, वकील मिलींद कुऱ्हाडे, सहायक काय्रक्रम अधिकारी शशिकांत कदम, उप
शिक्षणाधिकारी विजय ओतारी आदी उपस्थित होते.
.
.
0000000


No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.