इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शनिवार, १ ऑगस्ट, २०२०

आजअखेर 2862 जणांना डिस्चार्ज -डॉ. बी. सी. केम्पी पाटील


       कोल्हापूर,दि. 1 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 843 प्राप्त अहवालापैकी 527 निगेटिव्ह तर 253 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (51 अहवाल प्रलंबित, 8 जणांचा दुसराही अहवाल पॉझीटिव्ह, 4 अहवाल नाकारण्यात आले) अँन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 61 प्राप्त अहवालापैकी 51 निगेटिव्ह आहेत, तर 10 पॉझीटिव्ह असे एकूण 263 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 6443 पॉझीटिव्हपैकी 2862 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 3394 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.

          आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत प्राप्त 263 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-11, भुदरगड- 1, चंदगड-1, गडहिंग्लज-1, हातकणंगले-17, कागल-4, करवीर-43, पन्हाळा-6, राधानगरी-6, शाहूवाडी-1, शिरोळ-5, नगरपालिका क्षेत्र- 30, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 119, इतर जिल्हा व राज्यातील-18  असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 143, भुदरगड- 138, चंदगड- 380, गडहिंग्लज- 245, गगनबावडा- 13, हातकणंगले- 524, कागल- 111, करवीर- 706, पन्हाळा- 264, राधानगरी- 213, शाहूवाडी- 269, शिरोळ- 241, नगरपरिषद क्षेत्र- 1357, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-1744 असे एकूण 6348 आणि इतर जिल्हा व राज्यातील - 95 असे मिळून एकूण 6443 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 6443 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 2862 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 187 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 3394 इतकी आहे.

000000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.