इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२०

आजअखेर 3951 जणांना डिस्चार्ज -डॉ. बी. सी. केम्पी पाटील

 


       कोल्हापूर,दि. 7 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 877 प्राप्त अहवालापैकी 751 निगेटिव्ह तर 59 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (63 अहवाल प्रलंबित, 4 अहवाल नाकारण्यात आले)  अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 552 प्राप्त अहवालापैकी निगेटिव्ह 457 तर 95 पॉझीटिव्ह, खासगी रुग्णालये/लॅब मधील 53 पॉझीटिव्ह तर 33 निगेटिव्ह अहवाल आरटी-पीसीआरला पाठविण्यात आले एकूण 207 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 8977 पॉझीटिव्हपैकी 3951 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 4777 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 207 पॉझीटिव्ह अहवालापैकी भुदरगड-1, गडहिंग्लज-8, हातकणंगले- 14, करवीर- 13, पन्हाळा- 4, राधानगरी-3, शिरोळ- 2, नगरपरिषद क्षेत्र- 56, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-106 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-189, भुदरगड- 245, चंदगड- 405 गडहिंग्लज- 284, गगनबावडा- 29, हातकणंगले-808, कागल- 158, करवीर- 962, पन्हाळा- 336, राधानगरी- 300, शाहूवाडी- 324, शिरोळ- 345, नगरपरिषद क्षेत्र-1853, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-2601 असे एकूण 8839 आणि इतर जिल्हा व राज्यातील - 138 असे मिळून एकूण 8977 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 8977 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 3951 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 249 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 4777 इतकी आहे.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.