कोल्हापूर, दि. 5 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील
2 राज्यमार्ग व 1 प्रमुख जिल्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पर्यायी
मार्गाने वाहतूक वळविण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक
अधीक्षक अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली.
करवीर
तालुक्यातील कोल्हापूर
शहराचा बाह्यवळण रस्ता कळंबे साळोखेनगर बालिंगे शिंगणापूर रामा-194 मार्गावरील
शिंगणापूर केटीवेअर रस्त्यावर 1 फूट पाणी आल्याने वाहतूक बंद असून आंबेवाडी चिखली
मार्गे पर्यायी वाहतूक सुरू आहे.
पन्हाळा
तालुक्यातील चिखली
बाजारभोगाव राज्य मार्ग क्र. 193 मार्गावरील करंजफेन गावाजवळ रस्त्यावर 1 फुट पाणी
आल्याने वाहतुक बंद असून पोहाळे-पोहळेवाडी मार्गाने व मलकापूर यळवण मांजरे
अनुस्कुरा मार्गे पर्यायी वाहतूक सुरू आहे.
आजरा
तालुक्यातील नवले
देवकांडगाव, साळगाव प्रजिमा 58 वरील साळगाव बंधाऱ्यावर 3 फुट पाणी आल्याने वाहतूक
बंद असून सोहाळे बाची मार्गे पर्यायी वाहतूक सुरू आहे.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.