इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शनिवार, ८ ऑगस्ट, २०२०

राधानगरीतून 4256 तर अलमट्टीतून 220000 क्युसेक विसर्ग सुरू

 

धरणसाठा


          कोल्हापूर, दि. 8 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 236.79 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वा. च्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 1400 व सांडव्यातून 2856 असा एकूण 4256  तर अलमट्टी धरणातून 220000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जांबरे मध्यम प्रकल्प व जंगमहट्टी मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे.

पंचगंगा नदीवरील-  शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- शिरगाव, राशिवडे, हळदी, खडक कोगे, सरकारी कोगे व तारळे. तुळशी नदीवरील बी, आरे. कासारी नदीवरील- कुंभेवाडी, कांटे, करंजफेण, पेंडाखळे, बाजारभोगाव, वालोली, पुनाळ तिरपण, ठाणे आवळे व यवलुज.  कुंभी नदीवरील- शेणवडे, मांडुकली, सांगरूळ, कळे व वेतवडे. धामणी नदीवरील- सुळे, आंबर्डे, पनोरे. वारणा नदीवरील-चिंचोली, माणगाव, कोडोली, खोची, तांदूळवाडी, मांगलेसावर्डे, शिगाव व चावरे. कडवी नदीवरील- सवतेसावर्डे, शिरगांव, सरूडपाटणे, बालूर, भोसलेवाडी, येलूर व कोपार्डे. दुधगंगा नदीवरील-सिध्दनेर्ली, बाचणी, सुळकूड, दत्तवाड, सुळंबी, कसबा वाळवे व तुरंबे. वेदगंगा नदीवरील-निळपण, वाघापूर,गारगोटी, म्हसवे, कुरणी, सुरूपली, बस्तवडे व चिखली, हिरण्यकेशी नदीवरील-साळगाव, ऐनापूर, गिजवणे, निलजी, हरळी, खणदाळ, देवर्डे, चांदेवाडी व जरळी. घटप्रभा नदीवरील-पिळणी, बिजूरभोगोली, हिंडगांव गवसे, कानडे सावर्डे, आडकूर, तारेवाडी व कानडेवाडी, ताम्रपर्णी नदीवरील-कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, कोवाड, माणगाव, व कामेवाडी असे एकूण 85 बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात 715.55 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 94.999 इतका पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 98.29 दलघमी, वारणा 974.19 दलघमी, दूधगंगा 719.12 दलघमी, कासारी 78.57 दलघमी, कडवी 71.22 दलघमी, कुंभी 76.834 दलघमी, पाटगाव 105.24 दलघमी, चिकोत्रा 43.115 दलघमी, चित्री 53.29 दलघमी, जंगमहट्टी 34.65 दलघमी, घटप्रभा  44.17  दलघमी, जांबरे 23.23 दलघमी, कोदे (ल पा) 6.06 दलघमी असा आहे.

            तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 44.8 फूट, सुर्वे 41.8 फूट, रुई 71.6 फूट, इचलकरंजी 66.6 फूट, तेरवाड 58 फूट, शिरोळ 54.3 फूट, नृसिंहवाडी 53.9 फूट, राजापूर 42.3 फूट तर नजीकच्या सांगली 22.79  फूट व अंकली 29.6 फूट अशी आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.