** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, August 7, 2020

95 बंधारे पाण्याखाली

 


          कोल्हापूर, दि. 7 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज दुपारी 4 वा. च्या अहवालानुसार जिल्ह्यातील 95 बंधारे पाण्याखाली.

पंचगंगा नदीवरील-  शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- शिरगाव, राशिवडे, हळदी, खडक कोगे, सरकारी कोगे व तारळे, तुळशी नदीवरील- बाचणी, आरे व बीड. कासारी नदीवरील- कुंभेवाडी, कांटे, करंजफेण, पेंडाखळे, बाजारभोगाव, वालोली, पुनाळ तिरपण, ठाणे आवळे व यवलुज. कुंभी नदीवरील- शेणवडे, मांडुकली, कळे, वेतवडे व सांगरुळ. धामणी नदीवरील- सुळे, आंबर्डे, पनोरे, गवशी, म्हासुर्ली व शेळोशी. वारणा नदीवरील-चिंचोली, माणगाव, कोडोली, खोची, तांदुळवाडी, मांगलेसावर्डे, शिगाव व चावरे. कडवी नदीवरील- सवतेसावर्डे, शिरगांव, सरूडपाटणे, बालूर, भोसलेवाडी, येलूर व कोपार्डे. दुधगंगा नदीवरील-सिध्दनेर्ली, बाचणी, सुळकूड, दत्तवाड, सुळंबी, कसबा वाळवे व तुरंबे. वेदगंगा नदीवरील- कुरणी, सुरूपली, बस्तवडे, गारगोटी, म्हसवे, निळपण, वाघापूर, शेणगाव, व चिखली. हिरण्यकेशी नदीवरील- साळगाव, ऐनापूर, चांदेवाडी, हाजगोळी, भादवण, गजरगांव जरळी, हरळी, खणदाळ,, गिजवणे, निलजी व देवर्डे. घटप्रभा नदीवरील- बिजुरभोगोली, पिळणी, हिंडगांव गवसे, आडकूर, तारेवाडी व कानडेवाडी. ताम्रपर्णी नदीवरील-कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, कोवाड, माणगाव, कोकरे, न्हावेली, उमगाव व कामेवाडी, असे एकूण 95 बंधारे पाण्याखाली आहेत.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.