** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, August 12, 2020

दिव्यांग राष्ट्रीय पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 


        कोल्हापूर, दि. 12 (जिल्हा माहिती कार्यालय): दिव्यांग व्यक्ती व संस्थांना देण्यात येणाऱ्या दिव्यांग राष्ट्रीय पुरस्कारासाठी इच्छूकांकडून प्रस्तावाची मागणी करण्यात आली आहे. इच्छूकांनी आपले परिपुर्ण प्रस्ताव 22 ऑगस्ट पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी केले आहे.

             उत्कृष्ट कर्मचारी स्वयंउद्योजक दिव्यांग व्यक्ती, उत्कृष्ट नियुक्ती अधिकारी आणि  सेवायोजन अधिकारी किंवा संस्था, दिव्यांग व्यक्तींसाठी कार्य करणाऱ्या उत्कृष्ट व्यक्ती व उत्कृष्ट संस्था, प्रतीर्थ यश व्यक्ती, दिव्यांग व्यक्तींचे जीवनमान सुधारण्याच्या उद्देशाने केलेले उत्कृष्ट संशोधन उत्पादन निर्मिती, दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी अडथळा विरहित वातावरण निर्मिती करणारे कार्यालय, संस्था, दिव्यांग व्यक्तींना पुनर्वसन सेवा पुरविणारा उत्कृष्ट जिल्हा, राष्ट्रीय दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे कार्य करणारी राज्य संस्था, उत्कृष्ट कार्य करणारे प्रौंढ दिव्यांग व्यक्ती, उत्कृष्ट कार्य करणारे दिव्यांग बालक, उत्कृष्ट ब्रेल छापखाना, उत्कृष्ट सहजसाध्य संकेतस्थळ, दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीरणासाठी प्रोत्साहित करणारे उत्कृष्ट राज्य, क्रिडा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारी दिव्यांग व्यक्ती.

       केंद्र शासनाकडून देण्यात येणाऱ्या पुरस्कार योजनेचा तपशिल व त्यासाठी करावयाचा अर्जाचा नमुना जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद येथे उपलब्ध आहे. तसेच केंद्र शासनाच्या विकलांगजन सशक्तीकरण विभागाच्या  WWW.DISABILITYAFFAIRS.GOV.IN या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध आहेत. प्रस्त पुरस्काराचे अर्ज विहित नमुन्यात इंग्रजीमध्ये व हिंदीमधील संक्षिप्त माहितीसह व अर्जदाराच्या कार्याविषयी 150 ते 200 शब्दामध्ये इंग्रजीमध्ये तयार करून प्रस्तावास जोडावे, श्री. घाटे यांनी कळविले आहे.

000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.